सोलापूर : लोकशाहीच्या रक्षणासाठी.. संविधानाच्या रक्षणासाठी... स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, दडपशाहीच्या विरोधात उभे ठाकण्यासाठी रविवारी, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. पोलिस आयुक्तालय कार्यालयजवळच्या हेरिटेज लॉन, गांधी नगर येथे 'निर्भय बनो सभा' आयोजित करण्यात आलीय.
वर्तमान परिस्थितीमध्ये निर्भय पणे जगण्यासाठी निर्भय बनो विचारपीठाच्या वतीने महाराष्ट्रभर विवेकाचा जागर मांडत आहेत. त्या शृंखलेचा भाग म्हणून या सभेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी पर्यावरण तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, संविधान तज्ञ व कायदेतज्ञ विश्लेषक अॅड. असीम सरोदे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील लोकशाही व संविधान प्रेमींनी या सभेला मोठ्या संख्येंनं उपस्थित राहावं, असं आवाहन निर्भय बनो विचारपीठ, सोलापूरच्या वतीनं करण्यात आलंय.