सोलापूर : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या शिवजन्मोत्सवाचे वेध शहरातील विविध मंडळांना लागले आहेत. मंडळाच्या पदाधिकारी निवडीपासून अन्य तयारीला गती आली आहे. शिवालय सामाजिक संघटनेच्या उत्सव अध्यक्षपदी मोहन चटके यांची निवड करण्यात आलीय.
शिवालय सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. कार्याध्यक्ष - हरीश सिद्धे, उमेश पोरे, उपाध्यक्ष - शुभम नीळ, आनंद बाचुटे, संतोष सुरवसे, खजिनदार - अभिजित बिडवे, सहखजिनदार - सूरज वाजपेयी, मिरवणूक प्रमुख - श्रीपाद उमामी, लेझिम प्रमुख - सचिन मग्रुमखाणे, महिबुब नदाफ, श्रीकांत सनके आणि सेक्रेटरीपदी सिद्धार्थ भूतनाळे, आकाश फुलसे यांची निवड करण्यात आली.
या सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संजय शिंदे, शशी थोरात आणि राम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.