उर्दू वर्गाचे थाटात उद्घाटन; सोशल उर्दू विभाग व नजीर मुन्शी तौसिफी कमिटीचा उपक्रम
सोलापूर/इक्बाल बागबान: उर्दू भाषेच्या नव्हे तर प्रत्येक भाषेच्या संर्वधनासाठी समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रयत्न केल्या पाहिजे, तरच भाषा व भाषेचा अस्तित्व टिकून राहील. आज आपण सर्वजण मोबाईल इंटनेटच्या आहारी गेलो आहोत. वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे, अशा वेळी उर्दू भाषा शिकवण्याचे वर्गाचे सुरुवात होत आहे, ही आनंदाची बाब आहे . उर्दू भाषेचा साहित्य समृद्ध आहे, त्याचा लाभ या वर्गाच्या माध्यमातून नक्की होईल .अशी अपेक्षा प्राचार्य इ. जा. तांबोळी यांनी व्यक्त केली.
सोशल महाविद्यालय व नजीर मुन्शी तौसीफी कमिटीतर्फे उर्दू वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. उर्दू वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य इ. जा. तांबोळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेचे पर्सनल ऑफीसर अरविंदकुमार भगत उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अ. मन्नान शेख , शफी कॅप्टन, अय्यूब नल्लामंदू, उर्दू विभागप्रमुख डॉ. शफी चोबदार, उर्दू वर्गाचे समन्वयक इक्बाल बागबान, महेमूद नवाज, अन्वर कमिशनर, रफीक खान, सौ. तस्नीम वड्डो आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रा. डॉ. शफी चोबदार यांनी सर्वांचे स्वागत करत प्रस्ताविकेत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, जोपर्यंत सर्वांना उर्दू लिहिता वाचता येत नाही, तोपर्यंत हा वर्ग चालू राहिल यात काल मर्यादा ठेवण्यात आली नाही. उर्दू भाषेच्या "अल्फाबेट पोस्टर" दाखवून या उर्दू वर्गाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य इ. जा. तांबोळीनी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या शाल व बुके देऊन सत्कार केले.
रेल्वेचे पर्सनल ऑफीसर अरविंदकुमार भगतनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, गीत, गझल व उर्दू भाषेचा संक्षिप्त इतिहास सादर करून वाह वाह मिळविली. अन्वर कमिशनर, रफीक खान, अय्यूब नल्लामंदू यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
उर्दू वर्गाचे नूतन विद्यार्थी प्रा. पत्की, डॉ. जमादार आणि उर्दू वर्गाचे समन्वयक इक्बाल बागबान, उर्दू वर्गाचे शिक्षक अ. मन्नान शेख यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. शफी चोबदार यांनी केले तर डॉ. जैनोदीन पटेल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.