सोलापूर : दिलीपराव माने शिक्षण संकुलातील माजी-आजी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शैक्षणिक शिदोरीच्या मदतीने भावी वाटचालीत व्यक्तीगत प्रगतीतून समाजकारण करण्याचे आवाहन सहशिक्षक सचिन नाईकनवरे व उमेश जगताप यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षण संकुलात शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी २०१०-११ या शैक्षणिक वर्ष इयत्ता दहावी च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करणेत आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती संभाजीराव भडकुंबे व अध्यक्षस्थानी माजी सभापती रजनी भडकुंबे होत्या.
या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्थ अमित भडकुंबे व पाटलोजी जानराव, प्राचार्य राजेंद्र मोहोळकर, धर्मदेव शिंदे, उमेश जगताप, सचिन नाईकनवरे, अख्तर सय्यद, आशपाक अत्तार, सुप्रिया पवार, शशिकांत गायकवाड, विकी माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत पवार यांनी तर सुत्रसंचालन शिनेश रणशूर व राजश्री नागोडे यांनी केलं. तत्पूर्वी इ. १० वी च्या मुलींनी स्वागतगीत म्हटले. प्रारंभी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांनी स्वागत केले. या कार्यक्रमात माजी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी प्रेम, कृतज्ञता व्यक्त करुन शाळेने दिलेल्या ज्ञानाच्या व संस्काराच्या शिदोरीवर कष्टाने शिक्षक, वकील, फायनन्स, बँकीग, आयटीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संभाजीराव भडकुंबे व कार्यक्रमाचे अध्यक्ष रजनी भडकुंबे यांनीही सर्वांचे स्वागत व अनमोल मार्गदर्शन करुन माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात शाळेस भेट म्हणून तीन ग्रीन बोर्ड दिले. विशाल खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमास माजी विद्यार्थी सुशांत पवार, श्रीकांत पवार, बालाजी पवार, आकाश पवार, संभाजी खेडकर, विजय खांडेकर, शिनेश रणशुर, सागर कोळी, सुरज नागोडे, ज्ञानेश्वर राऊत, अनंत माळवदे, महेश जाधव, निखिल उडाणशिवे, विकास जाधव, विष्णु भोरे, बिपीन कांबळे, भाग्यश्री गायकवाड, सोनाली रोमन, निशाद काझी, राजश्री नागोडे, भाग्यश्री जाधव, सलिम पटेल, जमिर शेख, विशाल कोळी, महेश एकभाऊ तसेच इ.०१ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.