मोहोळ/प्रतिनिधी : सोलापूर येथे होणारा संविधान सन्मान मेळावा हा सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक मेळावा होणार आहे. त्यामुळे तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती असणे गरजेचे आहे, यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपाई युवकचे जिल्हाध्यक्ष मार्तंड उर्फ तात्या काळे यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे शाखा उद्घाटन व मोहोळ तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काळे हे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सोमनाथ कसबे हे तर जिल्हा सरचिटणीस रवि गायकवाड, विठ्ठल क्षिरसागर, अंकुश शेंडगे, हणमंत कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मराठा आघाडी, युवक आघाडी तसेच फादर बॉडी शाखा अशा तीन शाखांचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवक तालुका आघाडीच्या पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.
यावेळी युवक तालुका सरचिटणिस केदार कांबळे, कार्याध्यक्ष शहाजी सरवदे, संघटन सचिव प्रविण शेंडगे, खजिनदार साजन जगताप, उपाध्यक्ष अक्षय कसबे यांची निवड करण्यात आली. यावेळी अरुण कदम, सुनील जवंजाळ, आबासाहेब कुचेकर, रजनीश कसबे, बाळासाहेब सुतकर, श्रीकांत आठवले, संतोष धोत्रे, किरण खडके, शंकर वागज, तुकाराम भांगे, चंद्रकांत भांगे, धनंजय वागज, आनंद ओहोळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.