Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी कार्यालयासह शासकीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन


सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार विनायक मगर, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांच्यासह अन्य महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

माहिती कार्यालयात शिवजयंती साजरी



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे  शिवजयंती साजरी करण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, चंद्रकांत गायकवाड, योगेश तुरेराव, श्रीशेल चिंचोलकर, राजकुमार पवार, विजयकुमार जुंजा, नागेश दंतकाळे, सुदर्शन तेलंग, विजय भोसले यांच्या सह कर्मचारी संजय घोडके, भाऊसाहेब चोरमले आदी उपस्थित होते.

प्रशासकीय इमारतीत उत्साहात शिवजयंती साजरी



जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये विविध विभाग व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के व ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी पत्रकार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रघुनाथ बनसोडे चंद्रकांत चलवादी यांच्यासह पत्रकार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.