Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन


सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, जिल्हा सरचिटणीस रवी देवकर, जिल्हा खजिनदार  दाऊत अत्तार, शहराध्यक्ष संजयकुमार शिवशरण, प्रसिद्धी प्रमुख प्रा अभिजीत भंडारे, बाबा सातपुते, राजेंद्र सोरटे, असिफ कंदलगावकर, यशपाल आकाडे, प्रकाश कांबळे, सैपन नगारे, रोहितकुमार शिंदे,प्रिया,कदम मॅडम, सिद्धेश्वर भुरले, पंडित भदाडे, कु. ऋतुजा लोखंडे, युनुस बालगी, महिबूब तांबोळी इत्यादी पदाधिकारी व इतर सभासद उपस्थित होते.

महासंघाचे जिल्हा सेक्रेटरी रवि देवकर यांनी शेवटी सर्व उपस्थित आमचे आभार मानले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.