सोलापूर : समता सैनिक दल आणि शाक्य संघ, सोलापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मानवंदना देण्यात आली.
समता सैनिक दलाचे जी ओ सी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर आणि शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख केरु जाधव, रत्नदीप कांबळे, प्राचार्य वसिष्ठ सोनकांबळे, सुमित्रा जाधव, विनोद जाधव, शाक्य संघाचे माजी पोलीस निरीक्षक गौतम चंदनशिवे, उपनिरीक्षक कैलास गायकवाड, शांताराम वाघमारे, गुणवंत सुरवसे, शिवाजी भंडारे इत्यादी पदाधिकारी सभासद उपस्थित होते.