इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम; शिवकालीन कारागृह वासोटा किल्ल्यावर भटकंती
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा येथील वर्धनगडावर स्वच्छता मोहिम राबवून सोलापुरातील इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी शिवरायांना आगळ्यावेगळ्या पध्दतीने अभिवादन केले. यासोबतच शिवकालीन कारागृह असलेल्या वासोटा किल्ल्यावर भटकंती केली. या उपक्रमात ७५ हून अधिक निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदविला.
शिवजयंतीनिमित्त इको फ्रेंडली क्लबच्यावतीने वासोटा जंगल आणि वर्धनगड येथे भटकंतीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शनिवारी सकाळी इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांचा जथ्था सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला परिसरात पोचला. तासभर बोटींग करुन सर्वजण वोसाटा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या वन विभागाच्या चेक पॉईंटवर पोचले. वन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन जंगल भटकंतीला सुरुवात झाली.
घनदाट जंगलातील पायवाटेने निसर्गाचा आनंद घेत सर्वजण दोन तासात वासोटा किल्ल्यावर पोचले. उंचावरुन दिसणारा शिवसागर जलाशय, व्याघ्रगड, कोयना अभयारण्य परिसर निसर्ग किती अफाट आहे हेच दाखवून देत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. भारत माता की जय.. शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज की जय.. आदी घोषणा देवून सर्वांनी आपला आनंद व्यक्त केला. वनभोजनानंतर गडफेरीला सुरुवात झाली. किल्लेदाराचा वाडा, मारुती मंदिर, चुन्याचा घाणा, पाण्याचे टाके, बाबू कडा, शिवमंदिर आदी ठिकाणांना इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी भेट दिली. बाबू कडा येथील इको पॉईंटवर छत्रपती शिवाजी महाराज की जय.. यासह विविध घोषणा देवून घुमणार्या आवाजाचा अनुभव घेतला.
तासाभराच्या भटकंतीनंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. जंगल वाटेनेच खाली आल्यानंतर बोटींग करत सर्वजण शेंबडी गावात पोचले. आरोही टेंट हाऊसमध्ये रात्रीच्या मुक्कामाची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
रविवारी सकाळी शेंबडी गावातील दत्त मंदिर, मठ परिसरात सर्वजण दाखल झाले. शांत, सुंदर परिसरातील मंदिरात सर्वजण नतमस्तक झाले. काही वेळ घालवल्यानंतर पुन्हा बस प्रवास करत कास पठार, सातारा, कोरेगाव मार्गे इको फ्रेंडली क्लबचा जथ्था वर्धनगडच्या पायथ्याला दाखल झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत सर्व शिवप्रेमी काही वेळातच वर्धगडावर पोचले. वर्धनीमातेचे दर्शन घेतले. इतिहास जाणून घेतल्यानंतर उंचावरुन दिसणारे सुर्यास्त अनुभवले. वर्धनगडावर प्लास्टिकचा कचरा गोळा करुन सर्वांनी शिवरायांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केले.
इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक अजित कोकणे, सदस्य संतोषकुमार तडवळ, डॉ. ननवरे, सीए ललीत मगदुम, पत्रकार विनायक होटकर, अॅड. गाजुल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात डॉ. शुभांगी कनकी, आरव कनकी, नीता चिपडे, सलोनी चिपाडे, सहिषा चिपाडे, नेहा शशांक कुलकर्णी, गिरीश प्रभाकर घोगले, सौ. ऊमा गिरीश घोगले, प्रा. जीवराज सावळे, आरोही सावळे, सुवर्णा सावळे, सुवर्णा सावळे, डॉ. श्वेता दत्तात्रय मुसळे, एमआर दत्तात्रय मुसळे, शिक्षक सोमनाथ रामचंद्र गुंजोटे, पोलीस अंमलदार इंदिरा गुंजोटे, शिक्षिका परिचिता शहा, सीए ललित मगदूम, स्वाती मगदूम, रिया मगदूम, परम मगदूम, समिक्षा गवंडी, मनोरमा बँकेच्या संचालिका सुनीता पाटील, प्रतिज्ञा भोसले, संजय टोळे, गोविंद पाटील, अथर्व स्वामी, आर्यन शैलेश परांजपे, विश्वजित आंधळकर, नितीन चिदानंद पुरवंतस्वामी, समर्थ शेरखाने, पत्रकार विनायक होटकर, मनिषा होटकर, समर्थ होटकर, आर्यन होटकर, रजनी कंदीकटला, जयश्री आडके, हार्दिक आडके, स्नेहल बडबडे, गौसपाक उस्मान हल्याल, नफिसा गौसपाक हल्याल, इरम, गंगुबाई कोकणे, पूजा शेरखाने-कोकणे, डॉ.मंजुषा प्रवीण ननावरे, डॉ. सायली चांदेकर, डॉ. स्वाती जावळे, अंकिता शिंदे, संगमनाथ नागोजी, सनी पाटील, सचिन कांबळे, शैलजा घाटे, शशिकला गायकवाड, अजिंक्य जाधव, सार्थक आसबे, तनिष्क गायकवाड, प्रेमा कुंभार, अनुराधा जाधव, सेजल जाधव, अपूर्वा कुलकर्णी, झिया जमादार, अर्चना संगेवाडीकर, संचेता राठी, मृणाल पात्रुडकर, मैत्रेयी पात्रुडकर, प्रा. श्रीनिवास जगताप, सुचिता जगताप, समृद्धी जगताप, वैद्य प्रवीण बिरगे, शर्मिला करपे, कनिष्का करपे, अर्चना बोधे यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
छोट्यांचा उत्साही सहभाग
वासोटा जंगल आणि वर्धनगड जंगल भटकंतीमध्ये छोट्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदविला. यात आरोही सावळे, आरव कनकी, इरम हल्याळ, हार्दिक आडके यांचा सहभाग होता.