शिवजयंतीनिमित्त टायगर ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ व फळे वाटप

shivrajya patra


कासेगांव :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर, कासेगांव मधील विद्यार्थ्यांना टायगर ग्रुपचे तानाजी जाधव पिंटू ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत जाधव यांच्या तर्फे टायगर ग्रुप, कासेगांव च्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ व फळे वाटप करणात आली.

यावेळी मुख्याध्यापक सतीश कांबळे, आनंद गजबार, अंगणवाडी सेविका वेदपाठक मॅडम, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गायकवाड आणि टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते. 

To Top