मुंबई : संगीत जगतको उदास कर गये, पंकज उदास ... 'चिठ्ठी आयी है', हे गीत आणि अनेक अजरामल गझल संगीत विश्वात आपल्या स्मृतिच्या रुपात ठेऊन गझल सम्राट पंकज उदास यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं संगीत विश्वाची न भरून येणारी हानी झाल्याची भावना, त्यांचं सानिध्य लाभलेले महाराष्ट्राचे महागायक मोहंमद अयाज यांनी म्हटलंय.
सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांनी सोमवारी, २६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील बीच कॅन्डी हाॅस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. गायक पंकज उदास वयाच्या ७१ व्या वर्षी आपल्यातून निघून गेले, ही खूप दुःखद तसंच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने संगीत विश्व पोरके झाले.
दक्षिण आफ्रिका हा त्यांचा अखेरचा संगीत दौरा ठरला. अनेक दशके त्यांनी भारतीय संगीतच्या माध्यमातून आपली सेवा केली, ज्यांना गझल दुनियेतील पितामह भीष्म म्हणायला हरकत नाही! असंही महागायक मोहंमद अयाज यांनी म्हटले.
आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच कोणालाही उंच आवाजात बोलले नाहीत, सदैव हसतमुख राहिले, असा गझल गायक पुन्हा होणे नाही, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे मोहम्मद अयाज आपल्या भावना व्यक्त केल्या.