Type Here to Get Search Results !

सोनी मराठीवरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' च्या कलाकारांनी घेतलं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराचं दर्शन


सोलापूर : प्रत्येक वाहिनीवर असणारे कार्यक्रम-मालिका प्रेक्षकांच्या अधिकाधिक पसंतीला उतरतील, अशा वेगवेगळे विषय घेऊन दर्जेदार बनविण्याकडे प्रत्येकाचा कल असतो, सोनी मराठी वाहिनीवरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका त्यातील एक ... ! सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर अनेक तरुणींचा 'ड्रीम बॉय' दिसतोय, पण या 'ड्रीम बॉय'ची जी ' स्वप्न परी ' आहे, ती मयुरी या व्यक्तिरेखा भोवती फिरणारी ' अबोल प्रीतीची अजब कहाणी ' त्यांच्यातील अव्यक्त प्रेम कधी, कसं व्यक्त होतंय याची प्रेक्षकांत खूपच उत्सुकता आहे. 

राजवीर (अजिंक्य राऊत) आणि मयूरी (जान्हवी तांबट) यांच्यातील जवळीकता श्रीमंतीचा गर्व असलेली राजवीरची आई यामिनी (दिप्ती केतकर) ला पसंत नसते, कारण मयुरी सामान्य कुटुंबातील दिसते. उभयतांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी ती राजवीर बालपणातील मैत्रिण जोजो (सई कल्याणकर) ला घेऊन येते, मूळतः संपत्तीपुढं  मुलाचं नातं वा त्याच्या सुख याशी काही देणं-घेणं नसलेल्या यामिनी त्या कुटुंबाची संपत्ती व कुटुंबावर वर्चस्व गाजविण्याच्या विचारानं पछाडलेलं हे पात्र ! यामिनीनं नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांपुढं येतान मेहनत घेतलीय. 

 राजवीरचा अभिनय त्याच्या श्रीमंतीच्या थाटाला लाजवेल, इतका सुंदर आहे. त्यामागे त्याचा अभिनय क्षेत्राचा पुर्वानुभव ही त्याची जमेची बाजू आहे, मात्र तो आई म्हणेल, त्यास होयबा च्या रुपात दिसतो. मयुरी ही भाऊसाहेब म्हणून राजवीर ची अंगरक्षक वावरते, तर दुसऱ्या भूमिकेत ती मयुरी म्हणून दिसते. त्यात जोजो ची एन्ट्री या मालिकेचा टर्निग पॉईट असला तरी यामिनी तिच्या कट कारस्थानात किती यशस्वी होते ? जोजो मयुरीची कॉपी करण्यात किती यशस्वी होते अन् मयुरी-राजवीर कसं व्यक्त होणार यासाठी पाहिलीच पाहिजे, ' अबोल प्रीतीची अजब कहाणी ' सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता  सोनी मराठीवर दिसणार आहे.

....चौकट.....

' अबोल प्रीतीची अजब कहाणी ' मधील यामिनी ( दिप्ती केतकर, राजवीर (अजिंक्य राऊत) आणि मयुरी (जान्हवी तांबट) यांनी एकत्रित अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. मंदिर समितीच्या आदरातिथ्यांनं भारावलेल्या ' चमू ' नं स्वामी समर्थांपुढं  मनोभावे नतमस्तक झाले. अन्नछत्र मध्ये एकाच ताटात प्रसाद घेतला. त्यांनी सोलापुरात ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांचं दर्शन घेतलं, या दर्शनानं मन तृप्त झाल्याचे त्यांनी सांगितलं .

पत्रकारांशी संवाद साधताना, 

🟠राजवीर (अजिंक्य राऊत) यांनी 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही  तिसरी मालिका असल्याचं सांगून, त्यांचा तिसरा चित्रपट पुढ्च्या महिण्यात येतोय असं म्हटलं, त्यांच्या यशाचं सर्व श्रेय दिग्दर्शकांना जातं, असेही शेवटी सांगितले.

🟢मयूरी (जान्हवी तांबट) : 'अबोल प्रीतीची अजब कहाणी ' या मालिकेत मी भाऊसाहेब च्या भूमिकेत राजवीर चा अंगरक्षक आणि मयुरीच्या भूमिकेत अशा दोन भूमिका साकारत आहे. एकदा पुरुषी आणि लगेच स्त्री भूमिकेत कॅमेरा पुढे येताना मोठी कसरत करावी लागते, हे आव्हानात्मक काम आमच्या टीमच्या सहयोगांमुळं सर्व शक्य आहे, असे पदोपदी जाणवते. या मालिकेतील कथा छान वळणावर आलीय, यंग जनरेशनला आवडेलं, असंही त्यांनी सांगितले. 

🟡यामिनी (दीप्ती केतकर) : श्रीमंत घरात सर्व काही माझ्या मुठीत असावं यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते, प्रसंगी माझ्या मुलाचं सुख सुद्धा हिरावून घेऊ शकते या इर्षेने पेटून, मयुरीला राजवीर च्या आयुष्यातून बाजूला करण्यासाठी जे जे करता येईल, ते मी केलंय. माझी भूमिका नकारात्मक असली तरी, राजवीर मयुरी आणि जो जो या त्रिकोणात रंग भरणारी दिसते. आम्ही स्वामी समर्थ आणि सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मठात जाऊन आम्ही जी मेहनत-परिश्रम मालिकेच्या रूपातून लोकांपर्यंत पोहोचावं, प्रेक्षकांना निखळ आनंद मिळावा, अशी कामना केल्याचेही त्यांनी सांगितले.