सोलापूर : गर्दीचा फायदा घेऊन, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा दाखल गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय. या पथकाने गड्डा यात्रेत चोरीस गेलेले मंगळसूत्र आणि चोरीस गेलेल्या ०५ मोटरसायकली हस्तगत केल्या. एक विधी संघर्ष बालिका आणि तीन तरुणांकडून ०१.९० लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे माहिती कक्षातून सांगण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या होम मैदानवरील गड्डा यात्रेच्या गर्दीतून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीस गेल्याचा गुन्हा सदर बाजार पोलिसांकडे दाखल असून या चोरीतील मंगळसूत्र एक महिला विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची खबर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांच्या पथकास मिळाली होती. पथकाने खातरजमा केली असता, महिला पोलीस अंमलदार मपोना/१४२६ तांबोळी यांना एक विधी संघर्ष बालिका मिळून आली. तिच्या चौकशीत तिच्या जवळील मंगळसूत्र गड्डा यात्रेत चोरी केल्याची कबुली दिली. त्या मंगळसूत्राची किंमत २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
सपोनि निरगुडे व त्यांच्या पथकाने, त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अरबाज मेहबुब शेख (वय-२४ वर्षे, रा. शास्त्री नगर अंन्सारी चौक, सोलापूर) याच्या ताब्यातून चोरीचे ०२ मोटार सायकल, २) श्रीराम खुबराम यादव (वय २९ वर्षे, रा. मु. तुलसीपुर, पो. भरावन, थाना संधिला, जि. हरदोई, राज्य उत्तर प्रदेश) याच्याकडून चोरीच्या ०२ मोटार सायकल आणि सुर्यकांत आप्पाराव हेलगर (वय- ३९ वर्षे, व्यवसाय ट्रक ड्रायव्हर, रा. घ.नं. २१२ भवानी पेठ, सोलापूर, सध्या जयप्रकाश नारायण नगर, मुळेगांव रोड) याच्याकडून चोरीची ०१ मोटार सायकल, असे ०३ आरोपींकडुन, १,७०,००० रुपये किंमतीचे ०५ मोटार सायकल जप्त करून, ०५ गुन्हे उघडकीस आणले. त्यात, सोलापूर शहरातील ०३ मोटार सायकल चोरीचे गुन्हे, सोलापूर ग्रामीण कडील ०१ मोटार सायकल चोरीचा गुन्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील ०१ मोटार सायकल चोरीचा गुन्हा असे ०५ गुन्हे उघडकीस आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, व.पो.नि. (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार सफौ दिलीप किर्दक, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, सतिश काटे, बाळु काळे, अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, महिला पोलीस अंमलदार तांबोळी व लंगोटे यांनी पार पाडली.