हीच वेळ आहे !
नेते बलात्कार करतात,
तरी समाज त्यांना स्वीकारतो...
नेते करोडोच्या घोटाळ्यात जेलमध्ये जाऊन येतात,
तरी समाज त्यांना स्वीकारतो...
नेते खून... मारामारी.. जाती-जातीत भांडण लावून द्वेषाचं राजकारण करतात,
तरी समाज त्यांना स्विकारतो...
नेते हजारो कोटींचा घोटाळे करुन सहकारी संस्था बुडवतात,
तरी पण समाज त्यांना स्विकारतो...
नेते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी एका पार्टीमधून दुसऱ्या पार्टीमध्ये जातात,
तरी समाज त्यांना स्विकारतो...
मग जरांगे पाटलांवर एक दीड-दमडीचा माणूस खोटे आरोप करतो,
तर आपलेच काही अर्धवटराव एका प्रामाणिक नेतृत्वावर टीका करतात.
हीच वेळ आहे,
जरांगे पाटलांसोबत उभं राहण्याची...
समाजाला न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलांना साथ द्या, सरकार फक्त फोडा-फोडीचं राजकारण करणार आहे, आपण त्याला बळी न पडण्याची,
हीच वेळ आहे !
एक मराठा, कोटी मराठा
- शिवमती नेहा पाटील, छत्रपती संभाजी नगर.