Type Here to Get Search Results !

०२ मार्च रोजी बारामतीला नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंन्द्र, पुणे यांच्यामार्फत ०२ मार्च रोजी विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविदयालय, ता. बारामती (जिल्हा पुणे) येथे सकाळी १०.०० वाजता नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात २७० उद्योजक सहभागी होणार असून विविध नागवंत कंपनी, कारखाने, स्टार्टअप, स्वयंरोजगार महामंडळे, प्रशिक्षण संस्था, सेक्टर स्कील कौन्सिल तसेच सोलापुर जिल्हयातील सर्व आयटीआयमधील अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी तसेच मागील किमान ३ वर्षातील उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांनी सदर गेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.

तसेच ज्या आस्थापनांना उमेदवार भरती करावयाची आहे, अशा सर्व आस्थापनेतील प्रतिनिधिनी अॅप्रेन्टीस ट्रेनिंग विभागास संपर्क साधावा. तसेच भरती मेळाव्यास उपस्थित राहण्याकरीता उद्योजक आस्थापनांनी मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांनी आपल्या उद्योग आस्थापना https://forms.gle/bCgejmaQSFIQUSXAA  

या लिंकवर नोंदणी  करुन रिक्तपदे मेळाव्यासाठी अधिसुचित करावीत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी   https://forms.gle/CJzsEofSiHuERs359

 या संकेतस्थळावर दि. २९ फेब्रुवारीपर्यंत आपली नाव नोंदणी करावी.