सोलापूर जिल्हयासाठी सन 2024 मधील सण-उत्सव इत्यादी करीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सूट देणेबाबत आदेश पारीत केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग क्र.3 अन्वये सन 2024 या वर्षामध्ये रविवारी, 18 फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळा हा भारतीय सैन्यात सेवा बजावत असताना देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या वीर माता, पत्नी, वीर कन्या यांच्या हस्ते हा पाळणा सोहळा केला जातो.
याकरिता सकाळी 06.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सुट देण्याबाबत विनंती केल्याने 18 फेब्रुवारी या दिवशी सकाळी 06.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सुट देण्यात आली आहे.
ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. सदरची सूट शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. याची दक्षता घ्यावी, असेही आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.