सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आयपीएस दर्जाच्या ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी, ३० जानेवारी रोजी जारी केले. या बदल्यामध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांचाही समावेश आहे. डॉ. माने यांना महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक च्या सहसंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना पदोन्नतीवर सोलापूर पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. नूतन आयुक्तांकडून सामान्य नागरिकांच्या अपेक्षा उंचावलेल्या दिसत आहेत.
या बदलीच्या आदेशामध्ये पुणे शहराचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना महाराष्ट्र राज्य, मुंबई, महासमादेशक होमगार्ड पदी पदोन्नतीवर पाठविण्यात आले आहे. पोलीस महासंचालक व उप महासमादेशक, होमगार्ड, प्रभात कुमार यांना आपण पोलीस महासंचालक श्रेणीत पद अवतन करून महाराष्ट्र राज्य, मुंबई, च्या नागरी संरक्षण संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदल्यामध्ये सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबईचे सह आयुक्त शिरीष जैन यांना पदोन्नतीने राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग मुंबई चे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांना पदोन्नतीने त्याच विभागात अपर पोलीस महासंचालक पदाचा पदभार सोपविण्यात आलाय.
वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबईचे अपर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल यांना नागपूर शहराच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बदल्यामध्ये दत्तात्रय कराळे (पोलीस सह आयुक्त ठाणे शहर/ विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र), संजय शिंदे ( पोलीस सहआयुक्त, पिंपरी चिंचवड/ विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे), प्रवीण पवार ( विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई/ पोलीस सहआयुक्त, पुणे शहर), प्रवीणकुमार पडवळ ( पोलीस सहआयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई/ विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई) येथे बदली करण्यात आली असून त्या पदावरील संजय दराडे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र,नवी मुंबई चा पदभार सोपविण्यात आला आहे.
उर्वरित अधिकाऱ्यांमध्ये ज्ञानेश्वर चव्हाण ( पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर), एस. डी. एनपुरे ( पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई), एन. डी. रेड्डी ( पोलीस आयुक्त, अमरावती ), संदीप पाटील ( विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान, नागपूर), वीरेंद्र मिश्रा (विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर), रंजन कुमार शर्मा ( विशेष पोलीस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे), नामदेव चव्हाण (विशेष पोलीस महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल, नागपूर), विनिता साहू ( पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई), अंकित गोयल ( पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परीक्षेत्र), बसवराज तेली यांना पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदावर पदोन्नती देण्यात आलीय.
या बदली आदेशात शैलेश बलकवडे यांना अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर येथे पदोन्नती देण्यात आली. शहाजी उमाप यांना अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई, येथे पदोन्नती देण्यात आली आहे तर एस. जी. दिवाण पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र राज्य, पुणे पदावर असतील. संजय शिंत्रे यांना पदोन्नतीने पोलीस उप महानिरीक्षक, दक्षता, वस्तू व सेवा कर विभाग, मुंबई चा पदभार निश्चित करण्यात आलाय.
अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, पुणे शहर येथे पदोन्नतीने मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण पदी विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पदी पंकज देशमुख, जळगाव पोलीस अधीक्षक पदी एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी, जालना पोलीस अधीक्षक पदी अजय कुमार बंसल, परभणी पोलीस अधीक्षक पदी रवींद्रसिंह परदेशी, पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई पदावर रागसुधा आर., सांगली पोलीस अधीक्षक पदी संदीप घुगे, चंद्रपूर पोलीस अधीक्षक पदी मुमक्का सुदर्शन, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी धोंडोपंत स्वामी, अमरावती ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पदी पंकज कुमावत, पोलीस उप आयुक्त ब्रहन्मुंबई पदी मितेष घट्टे, नियोजन व समन्वय, पोलीस महासंचालक, मुंबई सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदी विक्रम साळी, बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त पदी आनंद भोईटे, विशेष कृती दल, नक्षलवाद विरोधी अभियान, नागपूर - पोलीस अधीक्षक पदी संदीप पखाले, नागपूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पदी रमेश धुमाळ तर बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त पदाची जबाबदारी समाधान पवार यांच्यावर सोपविण्यात आल्याचे या बदली आदेशात दिसते.