Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माता रमाई यांची जयंती साजरी


सोलापूर : स्वतः झिजून सर्वांना मायेची साऊली देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२६ जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने द स्केअर मॉल जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात माता रमाई यांच्या प्रतिमेस महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुद्धवंदना म्हणून विनम्र अभिवादन करण्यात आले.

माता रमाईंनी भक्कम पाठबळ दिले, म्हणूनच महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रोन्नतीत, सामाजिक कार्यात अतुल्य योगदान देता आलं. त्यांचं जीवन हे आजच्या स्त्रीशक्तीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले. 

याप्रसंगी कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर, समन्वयक शशिकला कस्पटे, युवक अध्यक्ष सुहास कदम, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, विद्यार्थी अध्यक्ष पवनकुमार पाटील, कार्याध्यक्ष दत्ता वाघमोङे, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष रियाज शेख, सामाजिक न्याय शहराध्यक्ष राजाभाऊ बेळ्ळेनवरु, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे,VJNT अध्यक्ष रुपेशकुमार भोसले, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसू कोळी, ज्येष्ठ नेत्या किरण मोहीते, सोशल मीडीया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, गणेश मासानी, राजेश्वरी कांबळे, श्यामराव गांगर्डे, सचिन चलवादी, धनंजय जाधव, तेजस चौधरी, दक्षिण तालुकाध्यक्ष दशरथ पवार, दक्षिण तालुका कार्याध्यक्ष सुरेश सावंत, वॉर्ड अध्यक्ष राहुल बेळ्ळेनवरु, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे, शहर सरचिटणीस ज्ञानू राठोड, सचिन अक्कलकोटे, श्रीकांत सावंत, यशराज डोळसे, लखन जमादार, राजूसिंग फटफटवाले यांची उपस्थिती होती.