नवी दिल्ली : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मंगळवारी, 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीतील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जलतरण तलाव संकुल येथे 1ली BIMSTEC एक्वाटिक्स चॅम्पियनशिप 2024 ला सुरुवात केली.
2018 मधील चौथ्या BIMSTEC शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली होती, जिथे त्यांनी BIMSTEC युवा जल क्रीडा स्पर्धा भारतात आयोजित करण्याची घोषणा केली होती. ज्यामध्ये जलतरण, वॉटर पोलो आणि डायव्हिंग इव्हेंटमधील 20 वर्षांखालील वयोगटातील स्पर्धा आयोजित केली असुन या तीन क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण 39 पदके दिली जातील आणि एकूण 9 ट्रॉफी पणाला लावल्या जातील. BIMSTEC सदस्य बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या देशांतील 268 क्रीडापटूंनी भाग घेतला आहे.
या स्पर्धेतील डायविंग या क्रीड़ा प्रकरात भारताचे प्रतिनिधित्व करताना सोलापुर च्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हीने २३४.०० गुणासह सिल्वर मेडल पटकावले आहे. या साठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्री. श्रीकांत शेटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.