Type Here to Get Search Results !

मशिद ट्रस्टीचा वाद आपसात मिटविण्याच्या बैठकीत खूनाचा प्रयत्न; नालबंद गटासह १८ जणांना सक्तमजुरी


सोलापूर : शहरातील इकरार अली मशिद ट्रस्टीचा वाद आपसात मिटवण्याच्या उद्देशानं बोलाविण्यात आलेल्या बैठकीत खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप न्यायालयात सिध्द झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग-१) श्रीमती आर. एन. पांढरे यांनी मेहबुब उर्फ दौला इस्माईल नालबंद, रियाज उर्फ गियासौद्दीन अहमदसाब रंगरेज, मतीन मुर्तज नालबंद याच्यासह १८ आरोपींना न्यायालयाने ०७ वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार दंडाची शिक्षा सुनावली. 

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, इकरारअली मशिदच्या ट्रस्टीचा वाद आपसात मिटविण्याकरीता सोलापूर शहर काझी यांनी ०१ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी ०२ वाजता इकरारअली मशिदमध्ये बैठक आयोजित केली होती. त्या मिंटीगसाठी फिर्यादी, साक्षीदार व आरोपी हजर होते. सदर मशिदचे आरोपी ट्रस्टी नसताना गेल्या २० वर्षापासून चंदा गोळा करतात, मशिदच्या जागेमध्ये बेकायदेशीर बांधकाम करतात, व त्या जागेमध्ये भाडेकरु ठेऊन भाडे वसूल करतात, त्याचा त्यांनी अद्यापर्यंत हिशोब दिला नाही, अशी माहिती फिर्यादी यांनी सदर मिंटीगमध्ये दिली. 

त्यावेळी मेहबुब उर्फ दौला इस्माईल नालबंद, रियाज उर्फ गियासौद्दीन अहमदसाब रंगरेज, मतीन मुर्तज नालबंद आणि इतरांनी जैनोद्दीन शेख व साक्षीदार यांना तुम्ही हिशोब विचारणारे कोण, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीनी विटाचे तुकडे, दगड व सळई यांने फिर्यादी जैनोद्दिन शेख, सलाऊद्दिन शेख, इमरान हवालदार, अन्वर जकलेर व फिर्यादीची आई मुमताज यांना मारहाण करुन आरोपी मेहबूब उर्फ दौला नालबंद यांनी फिर्यादीचा भाऊ सलाउद्दिन यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सळईने डोक्यात मारले. अशी फिर्याद जैनोद्दिन शेख यांनी दिल्यावर जेलरोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. बी. राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करुन एकूण २१ आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात खटल्याची सुनावणी चालू असताना यातील ०३ आरोपी मयत झाले. या प्रकरणात सरकार पक्षाने १० साक्षीदार तपासले. साक्षीदारांनी दिलेला पुरावा, वेद्यकिय प्रमाणपत्रे व सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश ( वर्ग-१) श्रीमती आर. एन. पांढरे यांनी मेहबुब उर्फ दौला इस्माईल नालबंद, रियाज उर्फ गियासौद्दीन अहमदसाब रंगरेज, मतीन मुर्तज नालबंद याच्यासह १८ आरोपींना न्यायालयाने ०७ वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार दंडाची शिक्षा सुनावली. तसेच पाचही प्रत्येक जखमीना प्रत्येक आरोपींनी दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

या खटल्यात मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. एच. एच. बडेखान, आरोपींच्या वतीने अॅड. धनंजय ए. माने, अॅड. पी. एम. ढालायत, सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकिल अॅड. अल्पना कुलकर्णी काम पाहिले. कोर्ट पैरवी महिला पोलीस हेड कॉ. ए. वाय. जहागिरदार (ब.नं. ७९६) आणि हेड कॉ. एम. रुपनर (ब.नं.१२७०) यांनी केली.

....' या ' आरोप सिद्ध .१८ जणांना सक्तमजुरी...

मेहबुब उर्फ दौला इस्माईल नालबंद, रियाज उर्फ गियासौद्दीन अहमदसाब रंगरेज, मतीन मुर्तज नालबंद, अल्ताफ रफियोद्दीन वंलमपल्ली, दाऊद अब्बास नालबंद, खलील खाजादाऊद नालबंद, अ. रज्जाक महीबूबसाब मंगलगिरी, म. गौस खाजादाऊद नालबंद, झुबेर मेहमूद नालबंद, हरुन रफियोद्दीन वंलमपल्ली, म.कासीम म. शरिफ नालबंद, मैनोद्दीन म. शरिफ नालबंद, मेहमूद म.यूसूफ नालबंद, फारुक अ. रज्जाक मंगलगिरी, हसन उर्फ सैफ अ. रज्जाक मंगलगिरी, आरिफ जिलानी नालबंद, इलियास अ.रज्जाक मुतवंली आणि सर्फराज म. शरिफ नालबंद (सर्व राहणार-सोलापूर)