सोलापूर : 'मी वडार महाराष्ट्राचा ' या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले आणि सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना सोबत घेऊन वडार समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करू, अशी ग्वाही देत महिला स्वावलंबी व्हाव्या म्हणून स्थानिक ट्रस्टच्या माध्यमातून ०५ लाख रुपयांची शैक्षणिक मदत जाहीर करीत सोलापुरातील मड्डीवस्ती येथील ५१ फूट हनुमान गड स्थापनेचा मार्ग सोलापूर जिल्हा नियोजन मंडळातून निकाल काढू, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते मड्डीवस्ती येथील हनुमान गडाला सदिच्छा भेट देते वेळी बोलत होते.
यावेळी मंचकावर मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले, श्री रूपाभवानी खाण क्रशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर, माजी नगरसेवक विनायक विटकर, माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल, माजी नगरसेवक अमर पुदाले, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे नूतन संचालक संजय साळुंखे, मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या महिला शहराध्यक्ष ज्योती चौगुले, शहराध्यक्ष सिद्धार्थ मंजेली, बाबुराव निंबाळकर, रामलाल विटकर, नवनाथ निंबाळकर, प्रथमेश आनंदकर, लक्ष्मण विटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बजरंगबलीच्या मूर्तीस नारळ फोडून पूजन करण्यात आले. या सदिच्छा भेटीचे प्रास्ताविक करताना शंकर चौगुले यांनी वडार समाजाला अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण मिळावे, पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार समाज आर्थिक विकास महामंडळची अंमलबजावणी व्हावी, जात पडताळणीसाठी १९६१ चा पुराव्याचीअट रद्द करावी, यासह अन्य मागणीसह ५१ फूट हनुमान गड हे वडार समाजातील खडी-दगड फोडणारे कामगार व खाणमालकांनी कोणतेही शासकीय अनुदान न घेता, वर्गणी गोळा करून हे हनुमान गडाचे काम पूर्ण केले आहे. त्यास आपण कायद्याच्या चौकटीतून मान्यता देऊन वडार समाजाचे हित साधावे, असेही त्यांनी म्हटले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले तर माजी नगरसेवक विनायक विटकर यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू मुधोळकर, राजू चौगुले, अरुण चौगुले, बालाजी निंबाळकर, दिलीप भांडेकर, लहू बंदपट्टे, अनिल चौगुले, सुनील शिंदे, नागेश मंजेली, हिरालाल माळेकर, नागेश निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी असंख्य महिला व समाज बांधव उपस्थित होते.