🚩
छत्रपती राजाराम महाराज जन्मोत्सवाच्या हार्दिक सदिच्छा !
(२४ फेब्रुवारी १६७०)
स्वराज्याचे तिसरे छत्रपती "राजाराम महाराज" हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र. राजाराम महाराजांचा जन्म राजगडावर झाला, त्यावेळी ते पालथे जन्मले, हा अपशकुन आहे असे भविष्यकाराने सांगितले तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की, अपशकुन नव्हे तर पालथा जन्मच्या अर्थ आमचा हा शूरपुत्र दिल्लीची पातशाही पालथी घालेल आणि छत्रपती राजाराम महाराजांचा बिकट व प्रतिकुल काळ पाहीला तर औरंगजेबाला निधड्या छातीनं सामोरं जात स्वराज्य ताब्यात घेण्याच्या त्याच्या मनसुब्याला पालथं घालणं, हे तितकच महत्वपुर्ण काम राजाराम महाराजांनी केलं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या अतिशय प्रतिकुल व अवघड काळात (१६७० ते १७००) छत्रपती राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या सहाय्याने स्वराज्य चालविले. त्यांच्या कारकिर्दीमधिल मोठा कालखंड तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली.
छत्रपती संभाजी राजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शिवाजी (शाहूराजे) हे लहान असल्याने व स्वराज्यावर आलेले महाकाय संकट पाहून महाराणी येसुराणीसाहेबांनी स्वराज्याची जबाबदारी अठरा वर्षांच्या राजाराम महाराजांकडे सोपविली. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर पंधरवड्यातच औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला आणि रायगड ताब्यात घेतला तत्पुर्वी येसुराणीसाहेबांनी गडावर सर्वांशी चर्चा करुन राजाराम महाराजांना जिंजी येथे पाठविण्याचा निर्णय घेतला होता. तामिळनाडू येथिल जिंजी किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार सुरु झाला.
मोगलांची ताकदवर आक्रमणे, स्वराज्याची खालावलेली आर्थिक परिस्थिती, मोगलांच्या वतनदारीच्या अमिषाला बळी पडलेले काही सरदार, सैन्याचा तुडवडा, निसर्गाचा असहकार अशा अनेक अडचणींचा धिराने व संयमाने सामना करत छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्य राखण्याचं काम केलं. अकरा वर्षे छत्रपती म्हणून अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्टा करुन स्वराज्यावरील महाकाय संकटाला थोपवून धरले आणि औरंगजेबाच्या स्वराज्य गीळंकृत करण्याच्या दिवा स्वप्नाला जोराचा तडा दिला.
सततच्या लढाया, आक्रमणे यामुळे छत्रपती राजाराम महाराजांना प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांचे २ मार्च १७०० ला किल्ले सिंहगड येथे निधन झाले. छत्रपती राजाराम महाराजांना अवघे तीस वर्षांचे आयुष्य लभले, त्यातील पुर्ण बारा वर्षे म्हणजे एक तप केवळ संघर्ष आणि संघर्ष केला. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वाढवून समृद्ध केलेल्या स्वराज्याचं निकराच्या प्रतिकुल परिस्थितीमधे संरक्षण करण्याचं काम छत्रपती राजाराम महाराजांनी केलं.. महाराजांच्या अद्वितीय कार्यकर्तृत्वास मानाचा मुजरा... !
छत्रपती राजाराम महाराजांच्या दोन राज मुद्रा असल्याचे दिसते,
"प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्व वंदीता
शिवासुनोरियंममुद्रा राजारामस्य राजते"
"श्री धर्म प्रदयोतितायं शेषवर्ण दशरथे रिव राजारामस्य मुद्रेयं विश्व वंदया विराजते"
जय जिजाऊ, जय शिवराय
🙏🏼
प्रशांत पाटील,
विभागीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ.