Type Here to Get Search Results !

पशुसंवर्धन विभागातील २४ कर्मचार्‍यांना सेवेत रुजू करा; शिवसेना शिंदे गट महिला आघाडीची मागणी


लातूर : लातुरच्या पशुसंवर्धन विभागातील २४ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. परंतु या अन्यायाविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी श्री. व सौ. बसवंती यांनी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सखोल माहिती देऊन या कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याची मागणी केलीय.

लातूर येथील पशुसंवर्धन विभागातील अंशकालीन कर्मचारी सेवक वर्ग ४ या पदावरील २४ कर्मचार्‍यांना निलंबित केले होते.  याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी सोलापूर जिल्हा प्रमुख सौ. आरती बसवंती व शिवसेना शिंदे गट ग्राहक संरक्षण कक्षाचे सोलापूर जिल्हा प्रमुख ओंकार बसवंती यांनी सखोल माहिती घेतली असता, या कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्याचे निदर्शनास आले.


त्यामुळं या कर्मचार्‍यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याची गंभीर दखल घेत श्री. व सौ. बसवंती यांनी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांना निवेदन देऊन सदर निलंबित कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आलीय.

यावेळी बंडु बाबर, लातूर जि.प. चे उपमुख्याधिकारी एन.एस.दानाळ, पशुसंवर्धन अधिकारी श्रीधर शिंदे आदींसह निलंबित झालेले सर्व कर्मचारी उपस्थित होते.