Type Here to Get Search Results !

ड्युटीकरीता घराबाहेर पडलेली डॉक्टर तिच्या मुलीसह बेपत्ता


सोलापूर : ड्युटीकरीता घराबाहेर पडलेली डॉक्टर महिला व तिची मुलगी शाळेच्या निमित्ताने बाहेर गेल्यावर त्या परत न आल्याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झालीय. बीएएमएस शिक्षीत शुभांगी अमोल पाटील (वय-३५) असं त्या महिलेचं नांव असल्याचे सांगण्यात आलंय.

१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ०७.३० वा. शुभांगी अमोल पाटील या ड्युटीच्या निमित्ताने व तिची मुलगी पर्वणी अमोल पाटील (वय-०८ वर्षे) ही शाळेच्या निमित्तानं घराबाहेर गेली होती. ते अद्यापपर्यंत परत आलेले नाहीत. नातेवाईकांकडे व मित्रांकडे चौकशी केली, परंतु मिळुन न आल्याने आप्पासाहेब महादेव पाटील (वय-६७ वर्षे, रा. आकाश रेसिडन्सी ब्लॉक नं ७३, जगदंबा नगर शेजारी जुळे सोलापूर) यांनी यांची सून व नात बेपत्ता झाल्याची तक्रार, १३ फेब्रुवारी रोजी दाखल केलीय.

बेपत्ता महिलेचे व मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

बेपत्ता महिलेचे नाव - शुभांगी अमोल पाटील (वय-३५ वर्षे), उंची - ५ फूट ५ इंच, रंग - सावळा, बांधा - सडपातळ, भाषा - मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, कपडे-गुलाबी रंगाचा टॉप व पांढ-या रंगाचा पायजमा, शिक्षण-BAMS

बेपत्ता मुलीचे नाव - पर्वणी अमोल पाटील वय- ०८ वर्षे, उंची - ४ फूट, रंग - सावळा, बांधा - सडपातळ, भाषा - मराठी, कन्नड, कपडे- ग्रे कलरचा KLE शाळेचा गणवेष, शिक्षण-तिसरी

उभयतांसंबंधी काही माहिती मिळाल्यास 0217 - 2744621 या दूरध्वनी अथवा 8087403050 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन पोना/१४२२ एम.आर. ढोबळे (नेमणूक-फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर) यांनी केलंय.