सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा समाज सेवा मंडळ, सोलापूरच्या वतीने व्याख्यानमाला, महाप्रसादाचे वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिलीय.
सरस्वती चौकातील छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल, येथे १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला होत असून शिवजयंतीदिनी, १९ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे.
व्याख्यानमालेचे आयोजन छत्रपती शिवाजी प्रशालेच्या मैदानावर करण्यात आलं असून सायंकाळी रोज ०६: ३० वाजता व्याख्यानास प्रारंभ होईल. शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी डॉ. संजय कळमकर, शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी मोनिका काळे तर रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी श्रीरंग लाळे यांचे व्याख्यान होणार असल्याचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी सांगितले.
यावेळी मराठा सेवा मंडळाचे पदाधिकारी, संयोजन समिती सदस्य उपस्थित होते.