सोलापूर : जातिवाचक शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी आणि फसवणूक प्रकरणी अटकेतील ऊसतोड कामगार नवनाथ रमेश तरडे याला त्याचे वकील अॅड. कदीर औटी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
याप्रकरणात हकीकत अशी की, २२ जून २०२२ रोजी ऊस तोडणी कामगार पुरवण्याचा व्यवहार फिर्यादीने केला होता. त्या अनुषंगाने ६ लाख ४८ हजार रूपयांचा व्यवहार फोन पे व गुगल पे द्वारे झाला होता. त्यानंतर दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी मागील झालेल्या ऊस तोडणी कामगार पुरवण्याच्या व्यवहार संबंधित आरोपी नवनाथ रमेश तरडे यास विचारले असता त्याने फोनवरून फिर्यादीस "तुझे मर्डर करतो, तुझी सुपारी आली आहे, असे म्हणतात. जातीवाचक शिवीगाळ केली होती". अशा आशियाची फिर्याद भा.द.वि. कलम ४२०,५०४,५०६ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारणा कायदा २०१५ चे कलम ३(१)(r),३(१)(s),३(२)(v) अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाण्यात, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपीस दिनांक ०४ जानेवारी २०२४ रोजी अटक झाली होती.
त्यामुळे आरोपीने आपला जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे दाखल केला होता. सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रय कापुरे आणि ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.