मोडनिंब : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे, मराठा समाज हा पूर्वपार ओबीसी असून शासनाने मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे, अशी स्पष्ट भूमिका बहुजन रयत पार्टीची आहे. बहुजन रयत पार्टी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ११० जागा लढवणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची पार्टी असून शाहू, फुले व शिवछत्रपती यांच्याप्रमाणे आम्ही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ, असे सांगून ईव्हीएम मशीन बाबत विचारणा केली असता काँग्रेसनेच ईव्हीएम भारतात आणली व आता बंद करण्यासाठी मात्र काँग्रेस पक्षातून पाहिजे, तेवढा उठाव दिसत नसल्याचेही मोहिते यांनी यावेळी म्हटले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय लोखंडे, राज्य युवकचे अध्यक्ष हेमंत मोहिते, राज्य सचिव महादेव दोडमणी, महिला आघाडीच्या शैला रोकडे, अश्विनी अभिवंत, साधना अभिवंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.