सोलापूर : महापुरुषांच्या जयंती निमित्ताने डॉल्बीसारख्या घातक बाबींना फाटा देऊन पारंपारिक मर्दानी लेझीम, ढोल पथक, मल्लखांब प्रात्यक्षिके, टाळ-मृदंग यासारख्या वाद्य पथकाच्या साजरा करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा आणि यास प्रोत्साहन देण्याची जबाबदारी ही युवकांची आहे, असे मत माजी सहायक सरकारी वकील ॲड. हरिभाऊ जाधव यांनी व्यक्त केले.
शिवजन्मोत्सवाच्या पुर्वसंध्येला पाळण्याच्या कार्यक्रमात ढोल पथकाचे सादरीकरण केलेल्या धुरंधर ढोल ताशा पथक व विश्ववाद्य ढोल ताशा पथक मंडळांचा सत्कार व गौरव शिवालय सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, शिवालय सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे, उत्सव अध्यक्ष मोहन चटके, राज पुणेकर, शिवानंद सोलापूरे, सुरेश रुपनर, रवि अंधारे, प्रशांत बिराजदार, शिव, विनोद शिंदे, ज्योतिराम मोरे, अजित पाटील, रमाकांत ताटे, शेखर कवठेकर, विजय घुले, अमोल कामाने, राहुल जगताप, प्रशांत घुले, उमेश पौळ, सिद्धार्थ भुत्नाळे, सतीश बुजुर्के, सागर चव्हाण, महेश पवार आदी उपस्थित होते.