सोलापूर : सोलापूर न्यायालयाच्या लगत असलेले झेरॉक्स, टाइपिंग खोक्याबाहेरील नामफलक-बोर्ड यावर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी, ती जप्त करून कारवाई केली. कट्टे जेसीबीने उद्धवस्त करण्यात आले. यावेळी खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने कारवाई यशस्वी झाली.
न्यायालयाच्या भिंतीलगत फुटपाथवर काहींनी अतिक्रमण करून दुकाने थाटल्याची तक्रार अतिक्रमण विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीनुसार अतिक्रमण विभागाने बुधवारी कारवाईची मोहिम हाती घेतली. या कारवाईत अॅड फलक, सिलेंडर जप्त केले आहे. या कारवाईवेळी खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला, मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे व त्यांच्या पथकाने विरोधाला न जुमानता कारवाईची मोहीम पूर्णत्वास नेली. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.