दिवसभरात ०५.३५ लाखाचा दंड ! ८६ ई-चलनाची दंडात्मक कारवाई

shivrajya patra

 

सोलापूर : सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालयाकडून शहराच्या विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचं मोठं काम या माध्यमातून होण्याच्या दृष्टीनं आशा पल्लवित होत असल्याचं दिसत आहे.  


बुधवारी, २८ फेब्रुवारी रोजी सीसीटीव्ही कॅमेरे व एक ट्राफिक अंमलदार यांच्या माध्यमातून  मोबाईल टॉकिंगचे ४६, ट्रिपल सीटचे ४० असे एकूण ८६ ई-चलनाची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सोलापूर शहर पोलिसांनी सांगितले आहे. 

बुधवारी दिवसभरातील वेहिकल ऍक्ट नुसार दाखल केसेसची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे
१२८ (१)/१९४(सी) MVA ट्रिपल सीट (६८) केसेस
१८४(सी) MVA
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे (४९) केसेस
२१/१८/ (१७७) MVA
रिक्षा चालविताना गणवेश परिधान न करणे (६५) केसेस
५०/१७७, ५१/१७७ MVA
फॅन्सी नंबर प्लेट (सर्व प्रकार वाहन) (७३ केसेस)
१९८ MVA
वाहनाच्या संबंधीत अनधिकृत हस्तक्षेप (बुलेटच्या साईलेंसर बाबत) (२७ केसेस)
CMVR ११९(२)/१७७ MVA
कर्णकर्कश हॉर्न वाजविणे (०२ केसेस)
CCTV द्वारे कारवाई (संपूर्ण सोलापूर शहर) (८६ केसेस)
इतर कलम अंतर्गत कारवाई (२९४ केसेस)
अशा प्रकारे ६६४ केसेस दाखल
एकूण दंड ०५, ३५, ३०० रुपये.

To Top