सोलापूर : माघवारी पालखी सोहळा (२०२४)समिती अखिल भाविक वारकरी मंडळ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर गुरुवारी, सायंकाळी ०४.३० वाजता माऊलींच्या आश्वाचे भव्य दिव्य गोल रिंगण सोहळा आयोजित करण्यात आलाय.
माघवारी पालखी रिंगण सोहळा २०२४ समितीचे वतीने प्रस्थान व रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण सहकुटूंब उपस्थित राहून सहकार्य करावे, असं आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळ, यांच्या वतीने करण्यात आलय.