Type Here to Get Search Results !

जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी" यांच्या परिश्रमातून पूर्णत्वास तळे हिप्परगा "समाधान" ध्यान मंदिर



भारतातच काय विदेशातही "मौन तपस्वी" म्हणून ओळखले जाणारे परम पूज्य श्रीम, नि, प्र.स्व जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी" घनमौनी, गाढे शिवयोग साधक, भक्तानुरागी असून समाज परिवर्तक, शापानुग्रह समर्थ, व स्वस्थ सुंदर समाज निर्मितिचे स्वप्न पाहणारे महास्वामीजी.

महास्वामीजींचा जन्म कर्नाटक राज्याच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील जडे गावात २३-३-१९४२ रोज रोजी झाला. त्यांचे वडील वे मू श्री सिद्धबसवय्या व आई मातोश्री चन्नविरम्मा होते. स्वामीजींचे लहान पणीचे नाव कोट्टुरेश्वर असे होते. वडील श्री सिद्धबसवय्या आयुर्वेदिक वैद्य असल्याने आयुर्वेदीक औषधांचे ज्ञान त्यांना वडिलांकडून मिळाले. यामुळे त्यांनी अनेक लोकांना अलोपॅथीने बरे न झालेल्या रोगांपासून मुक्त केले.

बालपणापासून अध्यात्माची आवड असल्याने त्यांनी प्राथमिक शिक्षण जन्म गाव जडे येथे संपवून सालूरु, हावेरी आशा व आणखी काही मठात आध्यात्मिक शास्त्रात व योगाभ्यासात प्राविण्य मिळविले. त्या नंतर हुब्बळ्ळी येथील मूरुसाविर मठ येथे स्वामी होऊ इच्छिणाऱ्या बटुना आध्यात्म शास्त्र शिक्षण्याची जबाबदारी पार पाडली. तिथे असतानाच त्यांना दुधनी श्री शांतलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिश म्हणून जबाबदारी स्विकारावी लागली. 

मग मात्र त्यांनी उसंत न घेता गाव सुधारणा, समाज सुधारणा व कल्याण, आध्यात्मिक साधने कडे लोकांचे मन वळवणे असे अनेक कार्यक्रम हाती घेतले. तसेच अंधश्रद्धा निर्मुलन, मद्यपान उच्चाटन, पशु बळी निबंध इत्यादी समस्या यशस्वी रित्या हाताळून त्यात यशस्वी झाले. २००१ साली स्वामीजींनी शष्ट्याब्दी समारंभा नंतर मठाधिश पदाचा राजीनामा दिला. पूढे काय? याचा विचार करत असतानाच सोलापूरच्या भक्तगणांनी आश्रमाचा प्रस्ताव मांडला.

दरम्यानच्या काळात स्वामीजींनी अनेक तपोनुष्ठान केले चाळीस वर्षापेक्षा जास्त काळा पासून मौन धारण केला आहे. त्रिकाल शिव पूजा, अल्प आहार- प्रसाद रूपात स्वीकार करतात, भक्तांसाठी सदैव आपले मन व दार उघडले ठेवून समाज सुधारण्यात आपले जीवन व्यतीत करणा-या महा स्वामीजींनी आपल्या वयाचे ८२ वर्ष पूर्ण करुन पुढे मार्गक्रमण करीत आहेत. या वयातही ते आध्यात्मिक साधना व तपोनुष्ठान करीत असतात. ते नेहमी भक्त, समाज, देश, इतकेच नव्हे तर सकल चराचर सृष्टीच्या योग क्षेमाचा सतत विचार करत असतात. म्हणूनच त्यांचा भक्त गण भारतच नव्हे तर विदेशात ही आहे.

परम पूज्य स्वामीजी हानगल श्री कुमार स्वामीजींच्या परंपरेत मार्गाक्रमण करीत असून लिं कुमार स्वामीजींचे पूर्ण न झालेल्या कार्याना पूर्णत्वाकडे नेमण्यात प्रयत्नशील आहेत. लिगैक्य कुमार स्वामीजींच्या कामावर प्रकाश टाकण्या साठी गुरुवर्यानी "विराटपुर विरागी चित्रपटाची निर्मिती ही करवली. भक्तांच्या उद्‌द्घारासाठी शिव जंगम रूपात अवतरतो, असे सांगितले जाते. गुरुवर्य जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी भक्तांच्या उ‌द्घारासाठी अवतरलेली जंगम मुर्ती होय.!

तळे हिप्परगा, समाधान ध्यान मंदिराचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत होतोय.