Type Here to Get Search Results !

बहुजन शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्यास यश... ! प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर यांना अखेर मिळाला न्याय


सोलापूर : बी. एफ. दमाणी प्रशाला, सोलापूर येथील मान्यताप्राप्त सहशिक्षक आणि महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे सहसेक्रेटरी डॉ. राजदत्त रासोलगिकर यांना अखेर न्याय मिळाला. त्यांच्या नावासह महाराष्ट्र शासनाचा निर्णय बुधवारी पारित झाला आहे. याप्रश्नी बहुजन शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे.

जात  प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना शाळेने सेवेतून कमी केले होते. त्यांचे जात वैधता प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शासन निर्णय दि. २१ डिसें२०२१ नुसार शाळेने त्यांना सेवेत सामावून घेणे गरजेचे होते. शाळेने रुजू करून न घेतल्याने डॉ. रासोलगिकर आणि अन्य चौघांनी महाराष्ट्र शासनाकडे दाद मागितली. याप्रकरणी संघटनेने पाठपुरावा केला असून महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आज पारित झाला आहे. या निर्णयानुसार डॉ. राजदत्त रासोलगिकर आणि अन्य चार जणांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, असे नमूद केले आहे.

याबद्दल महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, प्रकाश शिंदे, जिल्हा अध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सेक्रेटरी रवि देवकर, जिल्हा संघटक दाऊत आतार, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. अभिजित भंडारे, इरफान शेख, सोलापूर शहर अध्यक्ष  संजय शिवशरण, सल्लागार आगतराव बनसोडे, उपाध्यक्ष प्रकाश नगारे, दत्तात्रय शिंदे (अध्यक्ष, दक्षिण सोलापूर), प्रफुल्ल जानराव (अध्यक्ष, माढा तालुका) आदींनी अभिनंदन केलं आहे.