मोहोळ : मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे अर्जुनसोंड प्रतिनिधी विष्णु शिंदे यांची तर सचिवपदी कैलास रणदिवे यांची निवड करण्यात आली पदाधिकारी निवडीची बैठक नुकतीच पार पडली. या निवडी एकमताने करण्यात आल्या.
मोहोळ येथे आयोजित करण्यात आलेल्या मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी दिव्य मराठीचे किशोर मारकड, राम कांबळे, सचिव कैलास रणदिवे, खजिनदार नसीर मोमीन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सचिव अशोक पाचकुडवे होते.
यावेळी माजी अध्यक्ष संजय आठवले, भारत नाईक, बालाजी शेळके, सुभाष शिंदे,राजू शिंदे, दादासाहेब गायकवाड आदींसह पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.