लातूर : जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांचा संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खास महिलांसाठी हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी लातूर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर यांच्या हस्ते मोहंम्मद अयाज यांचा सत्कार करण्यात आला.
३१ जानेवारी रोजी ऑफीसर्स क्लब येथील आयोजित कार्यक्रमात मोहम्मद अयाज यांनी हिंदी, मराठी गाणी सादर करुन नारी शक्ती चा जागर केला. तसेच देशभक्तिपर आधारित विविध गाणी सादर करण्यात आले. वेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल यादव, निवासी उप जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, तहसील सौदागर तांदळे, तलाठी संघाचे अध्यक्ष हिप्परगे यांच्यासह अनेक अधिकारी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात हजारो रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
छायाचित्रात : लातूर चे जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांच्या समवेत गायक मोहम्मद अयाज