सोलापूर : सोलापूर कोर्ट प्रिमिअर लीगमध्ये २६ ते २८ जानेवारी दरम्यान झालेल्या जिल्हास्तरीय न्यायालयीन टेनिस बॉल सिझन १२ या क्रिकेट स्पर्धेत २० संघांनी सहभाग नोंदविला होता. रविवारी शेवटच्या दिवशी उपांत्य फेरीत डिस्ट्रीक्ट डायमंड संघांने माढा संघांचा पराभव केला चुरशीच्या अंतिम सामन्यात सी.जे.एम. चॅलेंजर संघांने डिस्ट्रीक्ट डायमंड संघाचा १३ धावांनी पराभव केला आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.
अंतिम सामन्यात डिस्ट्रीक्ट डायमंड संघांने नाणेफेक जिंकून सी.जे.एम. संघास फलंदाजीसाठी पाचारण केले. सी.जे.एम. चॅलेंजर संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ षटकांत ७६ धावांचे आव्हान ठेवले. सी.जे.एम. संघांकडून जहीर शेख यांनी १२ चेंडूत २९ धावा, प्रितेश हिंगमिरे यांनी ११ चेंडूत २५ धावा केल्या, हुसेन शेख यांनी ११ धावा देत २ गडी बाद केले. प्रत्युतरात डिस्ट्रीक्ट डायमंड संघ ७६ धावांचा पाठलाग करताना सी.जे.एम. संघांचे कर्णधार पवन गायकवाड यांनी घातक गोलंदाजी करताना २ षटकांत ४ धावा देत ३ गडी बाद केले, तसेच सागर आडकी यांनी १९ धावा देत २ गडी बाद या दोघांच्या गोलंदाजीसमोर अवघ्या ६२ धावांत पूर्णपणे कोलमडला.
अंतिम सामन्यामध्ये सामनावीर म्हणुन जहीर शेख यांना प्रदान करण्यात आला. अंतिम सामन्यात पारितोषिक वितरण समारंभास मुख्य न्यायदंडाधिकारी भंडारी, न्यायाधीश श्रीमती कौठुळे, डॉ. नरेंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी लीगचे चेअरमन श्री एम. बी.एम. शेख, ज्ञानेश्वर लिंबोळे, शाम राजेपांढरे, नबीलाल शेख, अमोल राउत, पवन गायकवाड, इरेश बिराजदार, बालाजी पिसे, संदीप वनकळसे, महेश कुलकर्णी, दिपक उंबरे, राहुल जाधव, रफीक पठाण, जहीर घारे, यांनी परिश्रम घेतले.
..... वैयक्तिक पारितोषिके....
मालिकावीर - अॅड. रसुल मुल्ला,
उत्कृष्ट फलंदाज - अॅड. विक्रांत फताटे,
उत्कृष्ट गोलंदाज - अमीर शेख,
उत्कृष्ट यष्टीरक्षक - जहीर शेख,
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - प्रवीण शहापुरकर, संजय बिगदे