त्यामध्ये सन २०२३ मध्ये भरोसा सेल, सोलापूर शहरकडे एकुण १२१८ व माता-पिता ७६ असे एकुण १२९४ महिला व ज्येष्ठ नागरिक छळासंदर्भात तक्रारी भरोसा सेल येथे दाखल झाल्या होत्या. भरोसा सेल येथे कार्यरत असलेले एकूण ३ अधिकारी व १५ कर्मचारी व भरोसा सेल समिती सदस्य असे मिळून येणारे तक्रारदार महिला तसेच वयोवृध्द ज्येष्ठ नागरीक यांच्या तक्रारीचे समुपदेशन करुन निवारण केले जाते.
भरोसा सेल येथे सोलापूर शहर हद्दीतील तक्रारदार महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे योग्य ते समुपदेशन करुन त्यांच्यात समझोता घडवून आणून त्यांना त्यांचे पुढील आयुष्य आनंदाने जगता यावे, यासाठी सर्वतोपरी मदत केली जाते.
कौटुंबिक घरगुती कारणांवरुन प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जात पती-पत्नी यांना भरोसा सेल येथे बोलावून एकमेकांसमोर बसवून त्यांचेकडे भरोसा सेल येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी समुपदेशन करुन त्यांच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही केली जाते. पिडीत महिलेबाबत तिचेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीविरुध्द् कायदेशीर कारवाई करणेकामी संबधित पोलीस ठाणे येथे पाठविले जाते. ज्या प्रकरणात समुपदेशन करुनही समझोता घडून येत नाही, अशी प्रकरणे कौटूंबिक न्यायालयाकडं पाठविली जातात.
सन २०२३ या वर्षात भरोसा सेल येथे पती-पत्नी प्रकरणामध्ये समुपदेशन करुन एकुण ६५१ संसार जोडण्यात आलेले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे एकूण ५२ प्रकरणांमध्ये समुपदेशन करुन मिटविले आहेत. भरोसा सेलचे माध्यमातून सदर जोडण्यात आलेले संसाराचा वेळोवेळी आढावा घेण्यात येतो.
ही कामगिरी पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, म. सु.वि. कक्ष, सहा. पोलीस निरीक्षक व पोलस उपनिरीक्षक तसेच महिला कक्षाकडील सर्व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.