राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
सोलापूर : लिंगायत समाजातील सर्व पोट जात भेदभाव विसरून महात्मा बसवण्णांची समतावादी विचारसरणी आचरणात आणून आपले रोटी-बेटी व्यवहार करावे. असं आवाहन परमपूज्य बसवलिंग महास्वामीजी यांनी केले.
महात्मा बसवेश्वर वधू-वर व सुचक केंद्र, कुपवाड, सांगली व लिगायत महामंच, भारत सहकार्याने रविवारी, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वा. येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधु- वर व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी परमपूज्य बसवलिंग महास्वामीजी उपस्थिततांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी सिंधु काडादी, शिवानंद गोगाव, विजयकुमार हत्तुरे आदींनी मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते वधू-वर व सूचक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
लिंगायत वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील लिंगायत वाणी, माळी, कुंभार,तेली, बनजगार गवळी ,जंगम,शिलवंत, दिक्षावंत, कोष्टी, पंचम, आदीसह सर्व पोटजातीतील वधु-वर व पालकांनी सहभाग नोंदवला. सुमारे चारशे वधू -वर व पालक यांनी याचा लाभ घेतला.
मेळावा यशस्वी होण्यासाठी स्वागताध्यक्ष आप्पासाहेब शेगावे, कार्यवाहक प्रियांका शेगावे, सुनिल दलाल, निलेश पाटील, श्रीशैल पॅडशिंगे, चंद्रकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.