मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवाज उठवण्याच्या द्याव्यात सूचना : सुनिल रसाळे
सोलापूर : २००४ साली मी मुख्यमंत्री असताना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे एकच आहे, असा जीआर काढला होता. त्याचवेळी सग्या सोयऱ्याचा प्रश्न महाराष्ट्रातून संपला असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि सर्व पक्षाचे जेष्ठ नेते यांना भेटून आगामी विशेष अधिवेशनात आमदारांनी मराठा आरक्षणावर भाष्य करून ते मंजूर करावे, यासाठी स्थानिक पातळीवर आमदारांकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जनवात्सल्य या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी मराठा समन्वयकांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे यांना मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
निवेदन देतेवेळी मराठा क्रांती मोर्चा ज्येष्ठ समन्वयक दास शेळके, सुनिल रसाळे, शेखर फंड, संजय घाडगे, गणेश शिंदे, विजय साळुंखे, बाबा शेख, निरंजन नवगिरे, महादेव हिंगमिरे, संभाजीराव शितोळे, चक्रपाणी गज्जम, विनोद शिरसागर, ओंकार यादव, अनिल मस्के, दिनानाथ शेळके, महेश जाधव यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.