सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने वाहतूक नियमन मोहिमेत वाहतुकीच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी गुरुवारी दिवसभरात ६०५ केसेस दाखल केल्या. त्यात CCTV द्वारे कारवाई (संपूर्ण सोलापूर शहर) ९९ केसेस इतकी असून दिवसभरात ०५, ३४, २०० रुपये दंड आकारण्यात आला असल्याचे माहिती कक्ष प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
वेहिकल ऍक्ट नुसार दाखल केसेसची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे
१२८ (१)/१९४(सी) MVA ट्रिपल सीट (५३) केसेस
१८४(सी) MVA
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे (७५) केसेस
२१/१८/ (१७७) MVA
रिक्षा चालविताना गणवेश परिधान न करणे (३२) केसेस
५०/१७७, ५१/१७७ MVA
फॅन्सी नंबर प्लेट (सर्व प्रकार वाहन) (७७ केसेस)
१९८ MVA
वाहनाच्या संबंधीत अनधिकृत हस्तक्षेप (बुलेटच्या साईलेंसर बाबत) (३० केसेस)
CMVR ११९(२)/१७७ MVA
कर्णकर्कश हॉर्न वाजविणे (०२ केसेस)
CCTV द्वारे कारवाई (संपूर्ण सोलापूर शहर) (९९ केसेस)
इतर कलम अंतर्गत कारवाई (२०७ केसेस)
अशा प्रकारे ६०५ केसेस दाखल
एकूण दंड ०५, ३४, २०० रुपये.
मंगळवारी ०४.७६ लाख, बुधवारी ०५.३५ लाख आणि गुरुवारच्या दंड आकारणीचा आकडा ०५.३४ लाख रुपये इतका असून दंड आकारणीचा रुपयांतील आकडा १६ लाख रुपयांकडे वाटचाल करतोय.