Type Here to Get Search Results !

सोलापूरबरोबरच पुणे आणि सांगली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे ०५ गुन्हे उघडकीस


सोलापूर : पोलीस आयुक्तालय हद्दीतील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याबरोबर सांगली व पुणे जिल्ह्यातील २ गुन्हे असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आलंय. चोरीची दुचाकी विक्रीसाठी थांबलेल्या बालाजी नागनाथसा मलजी याला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतल्यावर त्याच्या चौकशीत त्यानं, वेगवेगळ्या ठिकाणाहून ०५ मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यात ०२ लाख ३० हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सोलापूर शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासंबंधी वरिष्ठांकडून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सूचना होत्या. त्या अनुषंगाने स. पो. नि. संदीप पाटील व त्यांचे पथक शहर परिसरात गुन्हेगारांचा शोध घेत असताना, ०७ फेब्रुवारी रोजी, कोंतम चौकातील टू व्हीलर मेकॅनिक बालाजी मलजी चोरीची मोटरसायकल विक्री करिता घेऊन अक्कलकोट रस्त्यावरील लक्ष्मी मंदिराजवळ थांबला असल्याची विश्वसनीय माहिती पथकास मिळाली.

त्यानुसार स. पो. नि. संदीप पाटील व त्यांच्या पथकाने बालाजी नागनाथसा मलजी (वय-४९ वर्षे, व्यवसाय-मेकॅनिक, रा. घर नं-३७४, भारतरत्न इंदिरा नगर, राठी कारखान्यासमोर, सोलापूर) यास सापळा लावून ताब्यात घेतले. त्यानंतर, बालाजी मलजी याचेकडे, स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे तपास पथकाने, कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्याने सोलापूर शहरातील ०३ तसेच सांगली येथील ०१ व पुणे येथील ०१ अशा एकूण-०५ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. 

त्यानंतर, त्या चोरी केलेल्या ०५ मोटार सायकली काढून दिल्या. त्यानुसार, खालीलप्रमाणे ०५ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याचा तपशील फौजदार चावडी गुरनं-०६/२०२४, एमएच-१३ सी व्ही- ९४०७, ५०,००० रुपये, विजापूर नाका गुरनं-५०/२०२४, एम एच-१३ बी सी - ०९३९, ५०,००० रुपये, जोडभावी पेठ गुरनं -६०/२०२४, एमएच -१३ डी डी- ३१४६, ३०,००० रूपये, उमदी सांगली पो.स्टे. गुरनं-२५६/२०२१, एम एच -१० सी पी - ७५७४, ५०,००० रूपये आणि हिंजवडी पो.स्टे. पुणे गुरनं-२५/२०२१, एम एच -०९ सी टी - ८४३३, ५०,००० रूपये असा एकूण २,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगीरी  पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप पाटील, व पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, अविनाश पाटील, मच्छिद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली.