सोलापूर : फ्लॅट घेऊन देण्यासाठी विश्वासाने घेतलेली लाखोंची रक्कम देता आला नाही, म्हणून परत करण्याऐवजी खात्यावर पुरेशी रक्कम नसताना धनादेश देऊन फसवणूक करण्यात आलीय. हा प्रकार २०१७ ते या वर्षात, २ जानेवारी पर्यंत वेळोवेळी घडलाय. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी नितीन नागेश मोहिरे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, लक्ष्मी मार्केट रोडवरील शुक्रवार पेठेतील रहिवासी मयुरेश शामराव पाटील (वय- ४२ वर्षे) फ्लॅट घेण्यास उत्सुक असल्याचे दिसून आल्यावर नितीन गणेश मोहिरे यांनी त्यास फ्लॅट घेऊन देतो, या सबबीखाली गोडी गुलाबीने विश्वासात घेऊन जवळपास ३६ लाख रुपये वेगवेगळ्या माध्यमातून घेऊन, नवीन घर व फ्लॅट घेऊन दिला नाही.
गेल्या ०७ वर्षात फ्लॅट नाही तर घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्या रकमेसाठी मयुरेश पाटील यांनी तगादा लावल्यावर खात्यावर पुरेशी रक्कम न ठेवता फसवणूक करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी धनादेश देऊन वेळ मारून नेली. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मयुरेश शामराव पाटील यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 36 लाख रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी नितीन मोहिरे याच्याविरुद्ध दाखल केली.
त्यानुसार नितीन मोहिरे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसवडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.