Type Here to Get Search Results !

प्रभाकर महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


गुळवंची/तानाजी यादव : सोलापूर-बार्शी रस्त्यावरील गुळवंची येथील सदगुरूनाथ प्रभाकर महाराज मंदिरात प्रभाकर महाराज यांच्या ६७ व्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष भारत तांबे यांनी दिलीय.

सद्गुरू प्रभाकर महाराज यांच्या ६७ व्या पुण्यतिथी ‎महोत्सवानिमित्त २४ ते २७ फेब्रुवारीपर्यंत सर्व ‎कार्यक्रम होणार आहेत. गुलालाचा मोठा‎ कार्यक्रम २५ फेब्रुवारी रोजी रात्री १०.४५ वाजता‎ गुळवंची येथील मंदिरात पार पडणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ८ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर आरती करून महाप्रसाद वाटप केले जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.

२५ ते २६ फेब्रुवारीपर्यंत दररोज महापुजा,आरती व महाप्रसाद केला जाणार आहे. उत्सवाची सांगता २७ फेब्रुवारी रोजी गाव प्रदक्षिणा करून होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुळवंची सदगुरु प्रभाकर मंदिर समितीनं केलं आहे.