Type Here to Get Search Results !

जातीचा बोगस दाखला काढून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास लिंगायत समाज मतदान करणार नाही : लिंगायत महासभेचा ठराव


सोलापूर : येथील विमानतळासमोरील सिध्दव्वाबाई हत्तुरे संस्कृतीक भवन येथे रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. षस्टस्थल ध्वजारोहण करून जागतिक लिंगायत महासभा, सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित एक दिवसीय अभ्यास शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ मुगली बसवमंटपच्या महानंदा, शिवयोगाश्रम  प. पु. बसवलिंग स्वामीजी, धुत्तरगवा-उस्तुरी मठाचे कोरणेश्वर स्वामीजी, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे एम.के. फाऊंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे, राष्ट्रीय लिंगायत महामंच भारतचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जागतिक लिंगायत महासभेचे महाराष्ट्राचे प्रभारी प्रभुलिंग महागांवकर आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजशेखर तंबाके होते. 



लिंगायतधर्माचा इतिहास, सिद्धांत आणि संघटना या विषयावर अक्कलकोट खेडगी महाविद्यालयाच्या कन्नड विभागाचे प्रमुख डॉ.गुरुलिंगप्पा धबाले, बसवकेंद्रच्या सिंधु काडादी, पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ हे विषय मांडले.

 यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, प्लास्टिक सर्जन डॉ. शरणबसव हिरेमठ, शिक्षक संघांचे  जिल्हा अध्यक्ष यादवाड आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 या शिबिरात विविध विषयावर चर्चा होऊन विविध ठराव विजयकुमार हत्तुरे, राजशेखर तंबाके, मल्लिकार्जुन मुलगे, शिवानंद गोगाव यांनी मांडले. यात प्रामुख्याने खालीलप्रमाणे ठराव करण्यात आले.

ठराव क्रमांक १ 

एका जातीच्या बोगस दाखला काढणाऱ्या उमेदवारास या निवडणुकीत लिंगायत समाज मतदान करणार नाही.         

ठराव क्रमांक २ 

लिंगायत धर्मातील धर्मगुरू या पुढे कोणत्याही निवडणूक उभे राहिल्यास जागतिक लिंगायत महासभा विरोध करेल. 

ठराव क्रमांक ३

बसवकल्याण व कुडल संगम प्रमाणे मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक समिती लवकरात लवकर करावे.  

ठराव क्रमांक ४ 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व राज्य सरकार यांचे कर्नाटकचे सांस्कृतिक नायक म्हणून महात्मा बसवेश्वर यांचे नाव जाहीर केल्याबद्दल यांचे अभिनंदन चे ठराव करण्यात आले.                     

ठराव क्रमांक ५

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात अनुभव मंटप तथा बसव मंटप उभारण्यात यावे.                            

ठराव क्रमांक ६ 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व महाराष्ट्रातील उर्वरित विद्यापीठात पदवी अध्ययनात  वचन व शरण साहित्याचा समावेश करण्यात यावा.

ठराव क्रमांक ७

मुंबई येथे विधान भवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचे अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावे.       आदी सह अनेक विषयावर चे ठराव मंजूर करण्यात आले.

यावेळी नवनियुक्त तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.  वागदरी कन्नड शाळेतील मुलींचे वचन नृत्य, महिळा शाखेचे सदस्यांचे वचन गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आले. अभ्यास शिबिरात लिंगायतांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष शिवराज कोटगी, कोषध्यक्ष नगेंद्र कोगनुरे,सचिव धोंडप्पा तोरणगी, महासभेचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुलगे, जिल्हा महिला शाखे चे अध्यक्ष राजश्री थलंगे, विजय भावे, बसवराज चाकाई, शिवशरण लोकापुरे,राजेंद्र खसगी, दक्षिण तालुका अध्यक्ष डॉ. बसवराज नंदर्गी, मंगळवेढा तालुका अध्यक्ष अमोल म्हमाणे, राजेंद्र होऊदे राजेंद्र खसकी,डॉ.सिंदगी, सुधाकर कोरे आदीं परिश्रम घेतले.