लातूर : संत रविदास यांच्या ६२६ व्या जयंती निमीत्त लातूर येथील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या कार्यालयात संत यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुप्रसिध्द राजकीय विश्लेशक तथा गुरू रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले.
यावेळी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक, जयंती समितीचे सचिव इंजि. श्रीधर शेवाळे, कोषाध्यक्ष बालाजी साबळे, निमंत्रक सुभाष सूर्यवंशी, 'लसाकम ' चे संस्थापक नरसिंग घोडके, 'मुप्टा ' चे विभागीय अध्यक्ष प्रा.मकबूल शेख, कुरील सर आदी मान्यवर उपस्थित होते.