सोलापूर : जिल्ह्यातील अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याकरीता, २३ फेब्रुवारी ते ०५ मार्च या कालावधीमध्ये पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरावड्यामध्ये अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत संपूर्ण राज्यात पंधरवडा राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ज्या बालकांचे वय १८ वर्ष होण्यापूर्वी आई-वडील दोघांचेही निधन झाले आहे, अशा अनाथ बालकांनी अजून आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड दत्यादी दाखले काढलेले नाहीत, अशा सोलापूर शहरातील बालकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शोभा नगर, सात रस्ता, सोलापूर येथील श्रीमती पल्लवी व्हटाणे, समुपदेशक, (भ्रमणध्वनी क्रमांक 9637276418) यांच्याशी संपर्क साधावा, तसेच ग्रामीण भागातील बालकांनी संबंधित तालुक्यातील पंचायत समितीमधील अभय केंद्रातील कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व महिला बालविकास अधिकारी आर.बी. काटकर यांनी केलं आहे.