Type Here to Get Search Results !

०५ मोटारसायकल हस्तगत; शहर गुन्हे शाखेची कामगिरी

 


सोलापूर : पोलीस आयुक्तालय हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे काढण्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत  गुन्हेगाराकडून ०५ मोटरसायकली हस्तगत केल्या. या मोटरसायकलींची किंमत १.८० लाख रूपये असल्याचे सांगण्यात आले.

गुन्हे शाखेकडील सपोनि संजय क्षिरसागर व त्यांच्या तपास पथकाने सोलापूर शहरात दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करुन, गुन्ह्याचे घटनास्थळी मिळून आलेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. त्या आधारे तसेच मिळालेल्या बातमीच्या माहितीवरून, सपोनि संजय क्षिरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी, १९ फेब्रुवारी रोजी सोलापुरातील पोटफाडी चौकात इम्रान सलिम मडकी (वय-३२ वर्ष, रा. प्लॉट नंबर १७, अन्सारी चौक, शास्त्री नगर, सोलापूर ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोटार सायकलसंबंधी चौकशी केली असता, ती एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाल्याने जप्त केली. 

२० फेब्रुवारी रोजी मिळालेल्या बातमीवरून, सराईत मोटर सायकल चोर उमेश नागनाथ भोसले (वय-२६ वर्ष, रा. घर नंबर बी-११, भगवान नगर, झोपडपट्टी, सोलापूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्याने ०४ मोटर सायकल काढून दिल्याने त्या हस्तगत करण्यात आल्या. या मोटारसायकलीचे क्रमांक MH13CL3034, MH13 AU 8909, MH13 DB 1953, MH13CV8786 आणि MH13BW4665 असे आहेत. या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल १.८० लाख रुपये किंमतीचा आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त  एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे, व.पो. नि. (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे, यांच्या मार्गदर्शनाखाली, स. पो. नि. संजय क्षिरसागर, पोलीस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, राजु मुदगल, कुमार शेळके, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, प्रकाश गायकवाड, सतिश काटे, बाळू काळे यांनी पार पाडली.