सोलापूर : सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालय व विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कॉलेज कर्मचारी युनियन शुक्रवारी, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार होते, मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आलं असल्याचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी म्हटलंय.
सातव्या वेतन आयोगाची सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दि.१ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची ५ हफ्त्यापैकी ४ हप्त्याची फरकाची सोलापूर विभागाची ९ कोटी २७ लाख २६ हजार ही रक्कम सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयाने बुधवारी मंजूर केली आहे.
विभागीय शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाने ही रक्कम गुरुवारी जमा करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू केली असल्यामुळे हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असे कॉलेज कर्मचारी अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, खजिनदार राहुल कराडे, माजी सचिव ए. बी. संगवे यांनी कळविले आहे.