सोलापूर : मागील काही दिवसांपासून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यास अनुसरुन वरिष्ठांनी बैठक घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार विजापुर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला ४ मोटारसायकल आणि ०१ मोबाईल असा १,६५,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले.
विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात, १२ फेब्रुवारी रोजी होटगी रस्त्यावरील मुलतानी बेकरीजवळून आसिफ मुख्तार खान (वय ३२ वर्षे, कायम रा- गिलबटील रोड, पाटकर वाडी जवळ, अंधेरी, वेस्ट मुंबई, सध्या रा. साईनाथ नगर भाग २ मजरेवाडी, सोलापूर) यास ताब्यात घेऊन,त्याची चौकशी करता, त्याने किल्लेदार मंगल कार्यालयापासून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. चौकशीत, त्याच्या ताब्यातील वाहन त्याने सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची माहिती दिली. त्याच्या ताब्यातून ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१७ फेब्रुवारी रोजी विजापुर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सोरेगांव येथे विधी संघर्ष बालकाकडे घेऊन, विजापूर नाका पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यातील चोरीस गेलेली पल्सर २२० मोटार सायकल त्याचा ताब्यात मिळून आली. त्याच्याकडे पालकासमक्ष अधिक चौकशी करता, त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने जानेवारी महिन्यात विजापूर रोड परिसरातील ०२ आणि सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलाटी येथून ०१ मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ०३ गुन्ह्यातील ०३ मोटार सायकली असा १ लाख ०५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग -२) अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरिक्षक शहाजी पवार, उमाकांत शिंदे सो (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोउपनि मुकेश गायकवाड, पोहेकॉ सचिन हार, पोना गणेश शिर्के, हुसेन शेख, पोकॉ संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, कोर्सेगाव, यांनी पार पाडली.