पुणे : ज्ञानेश्वरीचे श्रेष्ठ उपासक वै दा.का.तथा भाऊ थावरे, सोलापूर, ह्यांच्या पत्नी विजयाताई दा. थावरे ह्यांचे शुक्रवारी, ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पुणे येथे निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या.
वंदनीय भाऊ थावरे ह्यांच्या अध्यात्मिक वाटचालीत विजयाताईंची खंबीर तितकीच श्रद्धायुक्त साथ होती. भाऊ आणि विजयाताई ह्यांनी समाजापुढे एक आदर्श संसारी जीवनाचे उदाहरण प्रस्थापित केले होते. त्यांच्या जाण्याने एका धर्मपरायण व्यक्तित्वास मुकल्याची खंत व्यक्त होते आहे. पतीचिया मता | अनुसरोनि पतिव्रता || ह्या माउलींच्या शब्दांचे अनुसरण हीच त्यांची जीवन धारणा होती. दुपारी दोन वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मुलगा संतोष,मुलगी सौ सविता, सून,जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.